Monday, 11 July 2011

आठवते मला माझे बालपण

धावपळीच्या जीवनात आठवते मला माझे बालपण,
जणू काही माझ्या बालपणीच्या आठवणींच्या बरणीचे झाकण.
रडत रडत हसणे, खेळताना झाडामागे लपणे,
कसे विसरू ते दिवस, कशी विसरू ती आठवण,
या धावपळीच्या जीवनातही आठवते मला बालपण.
ती फणसाची झाडे, तो आंब्याचा वास,
आता बालपणापासून खूप पुढे आला आहे माझा प्रवास.
तरी त्या आठवणी नाही विसरलो येते प्रत्येक क्षणी आठवण,
या धावपळीच्या जीवनातही आठवते मला बालपण.
ती ढगांची गडगडाट, तो पावसांच्या सरीचा आवाज,
किती सुंदर यायचा मातीचा वास!
आजही ढग गडगडले तरी येते त्याची आठवण,
या धावपळीच्या जीवनातही आठवते मला बालपण.

No comments:

Post a Comment