Monday, 11 July 2011

छंद


छंद म्हटले की आपण आपल्या लहानपणाच्या आठवणीमध्ये जातो. stamp गोळा करणे, नाणे गोळा करणे आणि बरेच काही वेगळे छंद. ते छंद करताना कधी घरच्यांचे ओरडणे ऐकणे, कधी छंद जोपासण्यासाठी भरपूर फिरणे. अश्या कित्येक आठवणी असात प्रत्येकाच्या.
खरे तर हे छंद आपल्याला कधीच सोडायचे नसतात पण जसे मोठे होत जातो तसे अभ्यास, वाचन आणि इतर गोष्टीमुळे आपण आपला छंद विसरून जातो. मोठेपणी जेव्हा अश्या छंदाची आठवण येते तेव्हा परत ती आपल्याला बालपणात घेऊन जाते.
 तसाच माझा पण एक छंद आहे कविता करायचा मी केलेल्या कविता म्हणजे माझी जगाकडे बघायची आणि मनातील भावना व्यक्त करणारी शब्दे.
काही कविता मला माझ्या बालपण सांगणाऱ्या, काही देशासाठी, काही कविता प्रेमात असताना केलेल्या आहेत.
त्याचबरोबर मी माझ्या आयुष्यातले अतिशय महत्वाचे क्षण ज्यांनी मला शिकवले, रडवले, जगवले असे अनेक क्षण मी नक्कीच सांगणार आहे.
मला माहित नाही माझे कवीरुपी शब्द तुम्हाला किती आवडतील पण तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळ्वा!

No comments:

Post a Comment