Friday, 15 July 2011

माणूस बनायचे आहे

मनाची माती मऊ आहे, आता विचार पेरण्याची गरज आहे.
हरवलेला मी इतक्या वर्षांनी थोडा जागा झालो आहे, त्याला आयुष्यभर पकडून
ठेवायची जिद्द आहे!
ना संकोच ना भीती आता मनसोक्त विचारांत - निर्णयात फिरायचे आहे.
माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःशीच लढायचे आहे.
माहिती नाही पण असेच मला घडायचे आहे.
मला आता खऱ्या अर्थाने माणूस बनायचे आहे.

Monday, 11 July 2011

देखो वक़्त हमे बुढापेके करीब लेके जा रहा है

देखो वक़्त हमे बुढापेके करीब लेके जा रहा है,
बचपन का हर एक लम्हा आंखो मैं नजर आ रहा है!
वो बचपन की मस्ती, वो उडती धूल, वो सोच मैं रहेना की कैसे खिलते है फुल!
वो रातो के तारे टिम - टीमते लाखो सितारे इस जहासे सब कितने लगते थे प्यारे!
वो पापा की डात, वो मां का प्यार और दोस्तो का कहेना अरे छोड ना यार!

आठवते मला माझे बालपण

धावपळीच्या जीवनात आठवते मला माझे बालपण,
जणू काही माझ्या बालपणीच्या आठवणींच्या बरणीचे झाकण.
रडत रडत हसणे, खेळताना झाडामागे लपणे,
कसे विसरू ते दिवस, कशी विसरू ती आठवण,
या धावपळीच्या जीवनातही आठवते मला बालपण.
ती फणसाची झाडे, तो आंब्याचा वास,
आता बालपणापासून खूप पुढे आला आहे माझा प्रवास.
तरी त्या आठवणी नाही विसरलो येते प्रत्येक क्षणी आठवण,
या धावपळीच्या जीवनातही आठवते मला बालपण.
ती ढगांची गडगडाट, तो पावसांच्या सरीचा आवाज,
किती सुंदर यायचा मातीचा वास!
आजही ढग गडगडले तरी येते त्याची आठवण,
या धावपळीच्या जीवनातही आठवते मला बालपण.

गुन्ता गुन्तिचि नाते सारी

गुंता गुंतीची नाती सारी नाते सारी...
कधी अनोळखी व्यक्तींशी जुळतात, मग ही नाती मानत फुलतात...
आयुष्य बनतात, हास्य फुलवतात...
दूर गेल्यावर आपल्याला रडवतात...
एकांतात जुने सुंदर शन डोल्यासमोर फूलवतात...
खरेच आयुषयात काही मित्र आयुष जगायाचे शिकावतात.

जिंदगी कितनी हसीन है

रखो खुद पे भरोसा, जिंदगी तुम्हारी इतनी बदल जायेगी.
हर दुख:मे भी आपको खुशी नज़र आएगी.
जब कभी आपको होगा दर्द तो सोचो जिंदगी हमे कुछ सिखाना चाहती है.
कुछ आछे काम सिर्फ़ हमसे करवाना चाहती है.
ज़रा देखो बाहर आकर हवाभी कुछ गुण - गुना रही है.
जिंदगी कितनी हसीन है ये ह्मे वो छूकर बता रही है.

माझे मीच जानतो

हळू हळू दिवसची सुरुवात झाली.
परत सगळया गोष्टिची घाई झाली.
कोणाचा विचार सुद्धा मनात येत नाही.
कारण आज स्वता: साठी वेळ नाही.
कोंणत्या गोष्टिचा मेळ नाही.
कारण मला स्वता:ला बघण्यासाठी वेळ नाही.
कुठे आहे मी कुठे मी चाललो.
हाच का तो मार्ग आहे ज्यासाठी मी सगलयाशी भांडलो.
एकांतात प्रत्येक शन मला आतून मारतो.
कारण काय होत्या माझ्या अपेक्षा हे फक्त मीच जानतो.
माझे मीच जानतो.

प्यार का दस्तूर

पतझड़ के बाद मौसम बरसात का आएगा!
हर गरजते बादल के साथ उनके आँखो से आसू बरस जाएगा!
बस इतना रखना ख़याल की हर दुआ हमारी खुशी ही आपके दामन मैं लाएगी!
मेरी हर साँस उसकी कीमत चुकाएगी!
हसते हसते फिर मौत ह्यूम गले लगाएगी!
ओर हम कहेंगे - कैसे भुलाये उनको? क्या यही प्यार का दस्तूर है?
मौत कहेगी हमसे प्यार किया तूने उस से यही तेरा कसूर है...!

आपल्या देशासाठी

Learningmate मध्ये असताना निधी जैन माझी सर्वात जवळची मैत्रीण (अर्थात अजूनही आहे). ऑफिस सुटले की घरी जाऊ पर्यंत मला विचारणार घरी पोहचलास की नाही? मला कविता करायची आवड आहे हे तिला माहिती होते ती माझ्या कवितेला सतत प्रोस्ताहना द्यायची.
एक दिवस मी टिटवाला स्टेशन स्टेशनला आलो पण आसनगाव ट्रेन ३० मिनिटे उशिरा होती, मी निधीला SMS केला की मी
टिटवाला स्टेशनला आहे ट्रेन यायला अजून ३० मिनिटे आहेत मी कविता करतो पण तू सांग कश्यावर कविता करू?
कधी विचार पण केला की माझ्या मैत्रीण देशप्रेमी असेल, तिने सांगितले तू बऱ्याच कविता केल्या पण देशावर एकही कविता नाही केलीस आणि आज देशावर कविता कर. विषय होता २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन खूप विचार केला पण शब्द काही जमत नव्हते पण कसे बसे शब्द गोळा केला परत जोडत जोडत एक कविता केली, ती निधीला पाठवली तिला कविता आवडली.


कविता अश्याप्रकारे आहे -

मृत्यू हा जीवनाचा अटळ भाग आहे. 
जो इथे आला तो जाणारच हे कडू लिखीत सर्वाना ग्यात आहे. 
लोक गेल्यावर कोण त्यांचे नाव घेणार, असा सगळ्यांचा भास आहे. 
जरा आठवा जे लढले आपल्यासाठी, जे हसत मेले आपल्यासाठी.
विसरू शकू का त्यानी वाहिलेले रक्त? असे हे आपल्या देशाचे प्रेमळ प्रेम भक्त.
ते गेले आपल्याला कोड्यात टाकून...मरु शकतो आम्ही देशासाठी हे सगळ्याना दाखवून. 
त्यांचे हे बलिदान इतिहासात कायमचे कोरले... 
आपण म्हणतो आपल्याला आहे झेंड्याचा मान. 
दुसर्‍या दिवशी तोच झेंडा पायाखाली येतो आणि आपण म्हणतो मेरा भारत महान... 
२६ जानेवारीला सगळ्याना हेच आहे सांगणे - चला करूया काही दान आपल्या देशासाठी... 
करून रक्तदान वचवू एक तरी प्राण, आपल्या देशासाठी... आपल्या देशासाठी... 

छंद


छंद म्हटले की आपण आपल्या लहानपणाच्या आठवणीमध्ये जातो. stamp गोळा करणे, नाणे गोळा करणे आणि बरेच काही वेगळे छंद. ते छंद करताना कधी घरच्यांचे ओरडणे ऐकणे, कधी छंद जोपासण्यासाठी भरपूर फिरणे. अश्या कित्येक आठवणी असात प्रत्येकाच्या.
खरे तर हे छंद आपल्याला कधीच सोडायचे नसतात पण जसे मोठे होत जातो तसे अभ्यास, वाचन आणि इतर गोष्टीमुळे आपण आपला छंद विसरून जातो. मोठेपणी जेव्हा अश्या छंदाची आठवण येते तेव्हा परत ती आपल्याला बालपणात घेऊन जाते.
 तसाच माझा पण एक छंद आहे कविता करायचा मी केलेल्या कविता म्हणजे माझी जगाकडे बघायची आणि मनातील भावना व्यक्त करणारी शब्दे.
काही कविता मला माझ्या बालपण सांगणाऱ्या, काही देशासाठी, काही कविता प्रेमात असताना केलेल्या आहेत.
त्याचबरोबर मी माझ्या आयुष्यातले अतिशय महत्वाचे क्षण ज्यांनी मला शिकवले, रडवले, जगवले असे अनेक क्षण मी नक्कीच सांगणार आहे.
मला माहित नाही माझे कवीरुपी शब्द तुम्हाला किती आवडतील पण तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळ्वा!